×

Create Account



Have already an account ? log in

दादांनी केला महायुतीच्या विजयाचा शंखनाद

By: Amit
28 Sep 2024   8:16 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर

दादांनी केला महायुतीच्या विजयाचा शंखनाद
• एकदा शब्द दिला तो दिला
• प्रपंच करतात माऊलींचा विचार आधी!
• जनतेने अनुभवी आमदार अनुभवले!
• निवडणूक महागली
• अजित पवारांची भव्य सभा

तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा २८ सप्टेंबर रोजी तुमसर शहरात दाखल झाली. त्यातून महायुतीच्या कामांचा आढावा जनतेपुढे मंडण्याकरीता तुमसरात पहील्यांदाच अजित पवार दाखल झाले. पवारांच्या जबाबदार शब्दांना ऐकण्याकरीता तुमसर मोहाडी विधानसभेतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचे लोंढे शहरातील नेहरू पटांगणाच्या दिशेने उसळून आले. आमदार कारेमोरे यांच्या नियोजनातून सभेला उसळलेली जनता, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला, पवारांचा शहरातील भव्य रोड-शो, आणि महायुतीच्या

लोककल्याणकारी योजनांची आकडेवारीतून दादांनी तुमसर मोहाडी विधानसभेत महायुतीच्या विजयाचा एकंदरीत शंखनाद केल्याचे चित्र त्यावेळी स्पष्ट दिसून आले. केंद्रात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींचे नेतृत्व त्यातून महाराष्ट्राच्या वाटेला आलेले विकासात्मक नियोजन, युकानांना संधी, महिलांना समान अधिकार याचा लेखाजोखा त्यावेळी अजित पवारांनी जनतेपुढे मांडला. दरम्यान खासदार प्रफुल पटले यांनी आपल्या विचारातून तुमसर मोहाडी विधानसभेचे भविष्य मांडले. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थिती होते.
------------------
एकदा शब्द दिला तो दिला

- राज्याच्या राजकारणातील अनेक उतार चढाव अनुभवले, त्यातही अर्थमंत्री म्हणून अनेक खडतर निर्णय आपण घेतले मात्र कधीही जनतेला दगा दिला नाही. जे जमेल तेच केले, एकदा शब्द दिला तर त्यावर कृतीतून खरे उतरून दाखविले. असे स्पष्ट शब्द त्यावेळी पवार यांनी बोलले. लाडक्या बहिणीच्या योजनेवर विरोधक शंका उपस्थित करतात, मात्र चांदया पासून ते बांधा पर्यंत माझ्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे महायुतीचा धोरणांपुढे विरोधक तोंडघशी पडल्याचे मत पवार यांनी त्यावेळी व्यक्त केले.
--------------------
प्रपंच करतात माऊलींचा विचार आधी!

- कुटुंब चालविताना शेवटी आपला विचार करणाऱ्या माय माऊलीचा महायुतीने आधी विचार केला. त्यात लाडक्या भावांना आपण कुठेही मागे ठेवले नाही. शेतीच्या दृष्टीने मोफत वीजपुरवठा, युवकांना रोजगार, प्रशिक्षण, कौशल्य उद्योजकता यातून आपण सर्व समायोजित सरकार चालविली. मात्र इतक्या पक्षांनी राज्यात सत्ता भोगली त्याचा भाग मी ही होतो, मात्र मोदींच्या नेतृत्वात पहिल्यांदा महिलांचा विचार करणारे सरकार म्हणून महायुती उदयास आली आहे. ती पुन्हा सत्येत येईल व सर्वसामान्य जनतेला न्याय देईल.
-----------------
जनतेने अनुभवी आमदार अनुभवले!

- मागील पाच वर्षात आमदार कारेमोरे यांनी अनेक मंचावरून जनतेला अंबोधित केले. अधिवेशनाच्या बाकावरून जनतेचे प्रश्न देखील अनेकदा मांडले. मात्र शनिवारला झालेल्या जन सन्मान सभेत विधानसभेतील जनतेच्या मागण्या मांडतांना, स्थानिक समस्या शब्दातून रेखाटताना आपल्या भाषणातून राजू कारेमोरे यांनी राजकारणाचे अनुभवच जणू प्याल्यागत आपले मत कणखरपणे मांडले. पहिल्यांदा स्थानिक जनतेने अनुभवी आमदार अनुभवले, अजित दादांच्या व्यतिरिक्त शहरात आमदारांच्याच परिपक्व भाषणाची चर्चा रंगली आहे.
------------------
निवडणूक महागली

- निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीच्या खर्चाचा अंदाज बांधून देतो. मात्र स्थानिक क्षेत्राच्या मागण्या, जनतेच्या अपेक्षा, रात्रीच्या काळोखात चालणारे तंत्र यातून कुणीही अनभिज्ञ नाही. तसे असले तरी शहरातील अजित पवारांच्या सभेनंतर तुमसर मोहाडी विधानसभेत निवडणुकीचे | व्हीआयपी | कल्चर सुरू झाले आहे. तंत्र युगाची साथ आणि यंत्रणा यांतून येणारी विधानसभा निवडणूक स्थानिक स्तरावर महागली असल्याचे चित्र अताच अनुभवास आले आहे.

  • 4
  • 0
leave a comment
comments