×

Create Account



Have already an account ? log in

तुमसर शहरात काँग्रेसचे जय डोंगरे नजर कैद

By: Jay
28 Sep 2024   8:51 AM
District Bhandara
Tumsar
तुमसर

तुमसर शहरात काँग्रेसचे जय डोंगरे नजर कैद

तुमसर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवार २८ सप्टेंबर रोजी तुमसर शहरात सभा नियोजित आहे. त्याच निमित्ताने काँग्रेसने राज्यात घडलेल्या अनुचित घटना, नागपूर येथील महिलांविरुद्ध वाढलेले गुन्हे, शेतकरी समस्या, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न, तथा स्थानिक विधानसभेत कारखान्यांचा

वणवा तसेच हयात असलेल्या कंपन्यांत परप्रांतीयांची मक्तेदारी अश्या अनेक गंभीर मुद्यांवर काँग्रेस अजित पवारांचा ताफा अडवून निदर्शने करणार असल्याची सूचना तुमसर पोलिसांना मिळाली होती. त्यातूनच कायदा सुव्यवस्था लक्षात घेता तुमसर पोलिसांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार युवक काँग्रेसचे प्रांतीय नेते जय सागर डोंगरे यांना तुमसर पोलिसांनी शनिवारला पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास नजरकैद केले. त्यामुळे शहरात अनेक

स्तरावर चर्चा रंगन्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी नियमाने जरी कारवाई केली असली तरी लोकतांत्रिक व्यवस्थेत विरोध दर्शवून आपल्या हक्कांची मागणी करण्याला मूबा असताना महायुती सरकार यंत्रणेचे दुरुपयोग करून हुकूमशाहीला खतपाणी देण्याचे काम करत असल्याची प्रतिक्रिया जय डोंगरे यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली आहे.

  • 12
  • 0
leave a comment
comments