×

Create Account



Have already an account ? log in

शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी आयपीएलची रेड

By: प्रा. टा.
19 Apr 2025   11:29 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर

शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी आयपीएलची रेड

बुकी आरोपी ठाण्यात
पोलीस ॲक्शन मोडवर

तुमसर : मधल्या काळात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा व कायदा हातात घेणाऱ्यांवरचे नियंत्रण सुटले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस खात्याने रीतसर चालविलेल्या धाड सत्रात आयपीएल जुगार भरविनाऱ्या बुकिंच्या खेम्यात चांगलाच गोंधळ माजला आहे. शनिवार रोजी रात्री ७ ते ९ वाजे दरम्यान

तुमसर उपविभागीय अधिकारी तथा शहर पोलिसांनी कर्तव्याच्या हद्दीत तब्बल तीन ठिकाणी आयपीएलची छापेमारी करून पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत आरोपींची मोठी गर्दी जमा केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे तुमसर पोलीस जुगाराविरुद्ध फुल ॲक्शन मोडवर आल्याचे त्या कारवाह्यांमधून स्पष्ट झाले आहे.
---------------
डीव्ह्याएसपी यांची कारवाई

- शनिवार १९ एप्रिल रोजी पहिली कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाने नवरगाव मार्गावर शेतशिवारात बसून बेटिंग करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून प्रविण राजु फटींग(२५), प्रशांत किशोर भुरे (३८), डिगंबर उर्फ डिगु दिलीप समरीत (२५) तिघेही राहणार तुमसर ह्या तीघांना ताब्यात घेतले तर चौथा आरोपी योगेश उर्फ भाजी हिरालाल गायधने (२९, राह. तुमसर) फरार झाल्याची माहिती कारवाईची लीड करणाऱ्या पोलीस उप निरीक्षक विजय पंचबुधे यांनी दिली आहे. सदर कारवाईत पोलिसांनी जुगारात वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
--------------
पोलीस निरीक्षकांची कारवाई

- दुसऱ्या कारवाईत घटनेच्या रात्री गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल यामध्ये चालु आलेल्या क्रिकेट सामन्यावर जुगार खेळणाऱ्या बुकीवर पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या नेतृत्वात टीमने दोन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन टास्क दरम्यान पोलिसांनी बोस नगरात गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून प्रणय प्रेमदास राऊत(२९, माता वार्ड), सुनिल उर्फ भुऱ्या सुरेश बिसने(३४, राह. मोठा बाजार चौक) दोघेही तुमसर यांच्या विरुद्ध फिर्यादी जयसिंग लील्हारे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९ अन्वये त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला. तर त्याच रात्री तिसऱ्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयिताकडून जुगारासंबंधी पुरेसे पुरावे नसल्याने त्याला सोडण्यात आले होते. उशिरापर्यंत चाललेल्या त्या कारवाईत पोलीस ठाण्यात आरोपींची मध्यस्ती करणाऱ्या राजकीय मंडळीची भाऊ गर्दी दिसून आली होती.
----------------------
सूचना पत्रावर आरोपींची सुटका

- पोलीस ठाण्यात शनिवारची रात्र गुन्हेगारी वातावरण तपविनारी ठरली होती. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अल्पावधीच्या करावासाच्या आधारावर ५ आरोपींना उशीरपर्यंत सूचना पत्रावर सोडले; तशी माहिती पोलीस विभागाने दिली.


  • 0
  • 0
leave a comment
comments