×

Create Account



Have already an account ? log in

साखळी शिवारात चारचकीला भीषण अपघात : महिला जागीच ठार

By: प्रा. टा.
18 Apr 2025   9:07 PM
District Bhandara
Tumsar
साखळी (मिटेवाणी)

साखळी शिवारात चारचकीला भीषण अपघात : महिला जागीच ठार

-सात प्रवासी जखमी
-जखमींमध्ये चिमुकल्यांचा समावेश

तुमसर : लग्न समारंभाकरीता निघालेल्या चारचाकीला तुमसर तालुक्यातील साखळी शिवारात भीषण अपघात घडला. अनियंत्रित चारचाकी शेतात शिरून त्यात बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. अपघात शुक्रवार (१८ एप्रिल) रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडला असून संगीता लक्ष्मीकांत सलामे (३८, राह. तुमसर) असे अपघातात दगावलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक महिला ही माजी नगर सेवक आदिवासी नेते लक्ष्मीकांत सलामे यांची पत्नी असून सक्षम मरस्कोले(७) नैवेद्य मरस्कोले(६), प्रियांश मरस्कोले(२),

प्रीती मरस कोल्हे(३०), वाहन चालक उमेश मरस्कोले(३८) सर्व राहणार मिटेवाणी, श्याम कला गुरवे(४५), सुमित्रा उईके(४०) दोघेही राहणार नागपूर हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना तत्काळ उपचारार्थ तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून संगीताचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता तुमसर रवाना करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी एकच गर्दी जमली होती.
-----------------
लग्नस्थळी शोककळा

- मृतक महिला मिटेवाणी येथील जखमी नातेवाईकांच्या घरून चारचाकी क्रमांक एम.एच.३१ सी.आर.७१९४ ने बघेडा येथे निघाले होते. मात्र अपघात घडून त्यात संगीता दगावल्याची माहिती मिळताच मिटेवाणी तथा लग्नस्थळी शोककळा पसरली होती. बघेडा येथे लग्न कार्यास जाणाऱ्या प्रवाशावर काळाने घाला घातला.
-----------------
गाडीचा चेंदामेंदा

- गाडीत जखमी चालक उमेश मरस्कोले यांचे अख्खे कुटुंब होते. तो स्वतः गाडी चालवत होता. मात्र गाडीवरून त्याचे नियंत्रण नेमके कसे सुटले याबाबत पोलीस तपास करत आहेत. अपघातात एक जीव दगावला असून गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्यावरून अपघाताची तीव्रता बघ्यांनी अनुभवली. घटनेची नोंद करून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे व टीम पुढील तपास करीत आहेत.


  • 0
  • 0
leave a comment
comments