×

Create Account



Have already an account ? log in

तुमसर पोलीसांची मोहफुल हातभट्टीवर धाड

By: प्रा. टा.
15 Jul 2025   5:18 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर(पवणारा)

१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

तुमसर : हातभट्टीची अवैध दारू गाळप होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे तुमसर पोलिसांनी तालुक्याच्या पवणारा क्षेत्रातील झुडपी जंगलात धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची धडक कारवाई मंगळवार(१५ जुलै) रोजी केली आहे. अवैध दारू गाळप करणाऱ्या आरोपी दीपक(गुड्डू)पतिराम धुर्वे(२८,

राह.आंबागड) याचे विरुद्ध गुन्हा नोंद करून कायदेशीर तसदी दिली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी ३ हजार रुपये किमतीची १५ लिटर दारू, ३ हजार किमतीचे गाळप साहित्य, २ हजारांची लाकडे जप्त केली.
-------------
९०० किलो मोहफुल नष्ट

- सादर कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक गंगवणी यांनी ३० किलो प्रति प्रमाणे तब्बल ३० बॅग्स अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सडवा नष्ट केला. जुलै महिन्यातील ही सध्याची मोठी कारवाई असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई पार पडली आहे. इतर सर्व प्रकारच्या साहित्य मिळून पोलिसांनी सदर कारवाईत तब्बल १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल काबीज केला आहे.
-----------------
कारवाईत तत्पर

- पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या विशेष सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध यंत्रणेने कंबर कसली आहे. त्यातूनच शहरात प्रतिबंधात्मक कारवायांचा सपाटा लागला आहे. सदर धाडीत तुमसर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार खात्यातील गिरीश पडोळे, तिलक चौधरी, सुनील सेलोटे, निखिल बिसने यांनी काम पाहिले.


  • 0
  • 0
leave a comment
comments